स्पर्धा नियमावली

खालील सूचनांची सर्वांनी  नोंद घ्यावी:-

 1. अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन सर्व संघांनी, संघ व्यवस्थापक व महाविद्यालयांनी करावे. जेणे करून बोगस खेळाडू खेळणार नाही.
 2. शैक्षणिक वर्ष २०१९-२० खेळाडूंची वयोमर्यादा आखिल भारतीय विद्यापीठ संघटना , नवी दिल्ली यांच्या पात्रता नियमानुसार २५ वर्षे अशी असेल.
 3. शैक्षणिक वर्ष २०१९-२० खेळाडूंची जन्मतारीख १ जुलै १९९४ नंतरची ग्राह्य धरण्यात येईल.
 4. खेळाडूंची संपूर्ण पात्रता प्रमाणपत्र फॉर्म महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीनेच भरलेला असावा.
 5. संबंधित खेळाडूने पूर्ण नाव (मराठी व इंग्रजी) , घराचा पत्ता, भ्रमणध्वनीनंबर, ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक, व रक्त गात याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त राहील.
 6. अनेक कॉलेजकडून खेळाडूंचे प्रोफोर्म योग्य रीतीने भरले जात नसल्याने अनेक चुका होता, खाडा खोड होते, मा.प्राचार्यांची सही नसणे, कॉलेजचा गोल शिक्का नसणे अशा चुका होतात. त्यामुळे खेळाडू स्पर्ध्येपासून वंचित राहतो याबाबत दक्षता घेण्यात यावी.
 7. १० वी बोर्ड प्रमाणपत्र (जन्मतारीख असलेले), १२ वी. मार्क्षित, डिप्लोमाचे मार्क्षित या झेरोक्स वर मा. प्राचार्य यांचे अटेस्टेड असणे क्रमप्राप्त आहे. ‍‍‍ झेरोक्स अटेस्टेड नसेल तर खेळाडूना स्पर्ध्येत सहभागी होता येणार नाही. तसेच ओरीजनल प्रमाणपत्र बरोबर ठेवणे.
 8. स्पर्धे दरम्यान खेळाडूना क्रीडा गणवेश असणे महत्वाचे आहे. तसेच त्याच्या मागे व पुढे चेस्ट नंबर निवड समितीला व्यवस्तीत दिसेल असा टाकावा.
 9. स्पर्धेय्मध्ये बोगस खेळाडू खेळताना आढळ्यास सदरील संघ त्वरित बाद केला जाईल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार संबंधित कॉलेजवर कारवाई केली जाईल.
 10. स्पर्धे दरम्यान काही वाद उदभवल्यास अन्यथा एखादा संघ, खेळाडू यांच्याबाबत तक्रार असल्यास संघ व्यवस्थापकाने त्वरित ५०० रुपये भरून लेखी अर्ज करावा. जेणे करून त्वरित तक्रार निवारण समितीसमोर ठेवून त्याच्याबाबत योग्य तो निर्णय दिला जाईल.
 11. स्पर्ध्येची रिपोर्ट वेळ सर्व संघांनी पालवी. उशिरा आलेल्या संघाच्या स्पर्ध्येदरम्यान विचार केला जाणार नाही.
 12. विभागीय स्पर्ध्येसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी दिलेल्या वेळेतच स्पर्ध्येच्या ठिकाणी ओरीजनल प्रमाणपत्र घेऊन संघ व्यवस्थापकास रिपोर्ट करावा.
 13. विभागीय स्पर्ध्येत खेळाडू सहभागी होणार नसेल तर त्वरित संबंधित कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालकांनी व्हीभागीय सचिवांना याबाबत माहिती ध्यावी. जेणे करून राखीव खेळाडूंना त्या स्पर्ध्येकरिता पाठविता येईल.

वरील सर्व सूचनांचे आपण सर्वांनी पालन करावे हि विनंती. तसेच अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने आयोजित स्पर्धासाठी सहकार्य करावे.